( १२८) चक्रोदय व्रतकथा.
चक्रोदय व्रतकथा. व्रतविधि – आश्विन शु. १३ ते १५ पर्यंत तीन दिवस या ब्रतिकांनीं प्रातःकाळो शुचिजलानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधीत- वने धारण करात्रीत. सर्व पूजाद्रव्ये हाती घेऊन जिनालयास जावे. मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन इंर्यापथशुद्धिपूर्वक जिनेंद्रास भक्तीनें साष्टांग नमस्कार करात्रा, पीठावर रत्नत्रय जिननतिमा यक्ष यक्षोसह स्थापून त्यांचा पंचामृतांनीं अभिषेक करावा. नंदादीप लावावा. अष्ट- द्रव्यांनी त्यांची अर्चना…