( १३४) कीर्तधर व्रतकथा.
( १३४) कीर्तधर व्रतकथा. व्रतविधि-वैशाख शु. ७ दिनीं या व्रत धारकांनी एकमुक्ति करावी. आणि ८ दिवशीं प्रातःकाळी शुचिजलानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढघौत वस्ने धारण करावींत. सर्व पूजाद्रव्ये हाती घेऊन जिनालयास जाने. मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापथशुद्धिपूर्वक जिनेंद्रास भक्तीनें साष्टांग नमन करावे. पीठावर सुपार्श्वनाथ तीर्थकर प्रतिमा नंदिविजय यक्ष काली यक्षीसह स्थापून तिला पंचामृतांनी अभिषेक करावा. अष्टद्रव्यांनी…