( १५१) वीर्याचार व्रतकथा.
वीर्याचार व्रतकथा. व्रतविधि – आषाढ शु. ३ दिवशीं या व्रतधारकांनी एकमुक्ति करावी. आणि ४ दिनीं प्रातःकाळीं शुद्धजलाने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधीतवस्ने धारण करात्रींत, सर्व पूजाद्रव्ये हातीं घेऊन जिना-लयास जावें. मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापथशुद्धिपूर्वक जिनें-द्रास भक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. मग पीठावर अभिनंदन तीर्थकर प्रतिमा यक्षेश्वर यक्ष व वज्रशृंखला यक्षीसह स्थापून तिला पंचामृतांनीं अभिषेक करावा. अष्टद्रव्यांनी…