(८) सकलसौभाग्यव्रतकथा
(८) अथ सकलसौभाग्यव्रतकथा. व्रतविधि – आश्विन शु. १४ दिवशीं प्रातःकाळीं या व्रतधा- रकांनीं प्रातुक पाण्यानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौत वस्खें धारण करावींत मग पूजा सानुश्री हाती घेऊन मंदिरास जावें. तेथे गेल्यावर चैत्यालयांस तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापथशुद्धि वगैरे क्रिया कराव्यात. श्रीजिनेंद्रास भक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. नंतर श्रीपीठा बर नवदेवता प्रतिमा यक्ष यक्षीसह स्थापून त्यांचा पंचामृतांनी अभिषेक…