(८१) गणधरवलयव्रतकथा
गणधरवलयव्रतकथा व्रतविधि – आषाढ, कार्तिक, फाल्गुन या मासांतील कोणत्याहि नंदीश्वर पर्वांत अष्टमी दिवशीं या व्रतिकांनीं शुचिजलानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौतवस्ने धारण करावीत. सर्व पूजाद्रर्षे आपल्या हातीं घेऊन जिनालयास जावे. मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथ शुद्धिपूर्वक जिनेंद्रास मक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. पीठावर जिन- प्रतिमा यक्षबक्षीसइ स्थापून तिला पंचामृतांनीं अभिषेक करावा. देवापुढे शुद्धभूमीवर गणधरवलयाचे यंत्रदल विधानांत सांगितल्या…