(७१) कुजपंचमीव्रतकथा.
कुजपंचमीव्रतकथा. व्रतविधि-चैत्रादि बारा मासांतून कोणत्याही मासांत ज्या दिवशीं मंगळवारी पंचमी तिथी असेल; त्या दिवशीं या ब्रतिकांनीं प्रभातीं सुखोष्णजलानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौत बस्ने धारण करावींत. मग सर्व पूजासामग्री आपल्या हातीं घेऊन जिनालयास जावे. मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथशुद्धिपूर्वक जिनेंद्रास मक्तीने साष्टांग नमस्कार करावा. नंदादीप लावावा. पीठीवर सुपा- श्वनाथ तीर्थकर प्रतिमा नंदीविजययक्ष कालीयक्षी सहित स्थापून तिचा…