२५. अहिगहीव्रतकथा.
अहिगहीव्रतकथा. श्रीमन्नाभिसुतं भक्त्या, वृषभं जिननायकं । स्थापये विधिना नच्त्वा, जंतूनां सुखकारकं ॥ १ ॥ व्रतविधी – आषाढ, कार्तिक, फाल्गुन या मासीं येणाऱ्या नंदीश्वर पर्वातील कोणत्याहि एका अष्टमी दिवशीं प्रभातीं या व्रत धारकांनीं शुचिजलानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौत वस्खें धारण करावींत. सर्व पूजासाहित्य हातीं घेऊन जिनालयास जावें. मंदिरास तीन प्रदक्षिणा पाळून ईर्यापश्चद्धि वगैरे क्रिया कराव्यात. मकीनें…