४३ सिद्धचक्रव्रतकथा.
सिद्धचक्रव्रतकथा. कर्माष्टकविनिर्मुक्तं, मोक्षलक्ष्मीनिकेतनं । सम्यक्त्वादिगुणोपेतं, सिद्धचक्रं नमाम्यहं ॥ १ ॥ व्रतविधि-आषाढ, कार्तिक, फाल्गुन या मासांतील येणाऱ्या कोणत्याहि एका नंदीश्वर पर्वात शु० ८ दिवशीं या व्रतधारकांनी प्रमातीं शुचिजलाने अभ्यंगस्नान करून आपल्या अंगावर दृढधौत वर्षे धारण करावींत. सर्व पूजा सामग्री हाती घेऊन जिनालयास जावें. मंदिरास तीन प्रदक्षिणा करून ईर्यापथ शुद्धिपूर्वक भक्तीनें श्रीजिनेंद्रास साष्टांग नमस्कार करावा. मंडप शृंगार…