( ११५) पर्वसागरव्रतकथा.
पर्वसागरव्रतकथा. व्रतविधि – आषाढ शु. १० दिवशीं या व्रतिकांनीं प्रमातीं शुचिजलाने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौत बस्ने धारण करावींत. सर्व पूजा साहित्य बरोबर घेऊन जिनालयास जानें. मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापथशुद्धिपूर्वक जिनेंद्रास भक्तीने साष्टांग नमस्कार करावा. पीठावर शीतलनाथ तीर्थकर प्रतिमा ईश्वरयक्ष आणि मानवी बक्षीसह स्थापून तिचा पंचामृतांनीं अभिषेक करावा. देवापुढे एका पाटावर दहा स्वस्तिके काढून…