(९८) कृष्णदेवकीव्रत अथवा संतानरक्षाव्रतकथा.
कृष्णदेवकीव्रत अथवा संतानरक्षाव्रतकथा. व्रतविधि – श्रावण शु. ११ दिनीं या व्रतिकांनी एकमुक्ति करावी. १२ दिवशीं प्रातः काळीं प्रासुक पाण्याने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौत वस्त्रे घ्यावीत. सर्व पूजासाहित्य बरोबर घेऊन जिन- चैत्यालयास जावे. मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथशुद्धिपूर्वक क्रिया करून जिनेश्वरांस भक्तीने साष्टांग प्रणिपात करावा. पीठावर वासुपूज्य तीर्थकर प्रतिमा षण्मुख यक्ष व गांधारी यक्षीसह स्थापून तिला…