(९०) सहस्रनामव्रतकथा.
सहस्रनामव्रतकथा. व्रतविधि – चैत्रादि बारा मासांतून कोणत्याहि मासांत शुभ दिवशीं अगर चातुर्मासांत अथवा तिन्हीं नंदीश्वरपर्वांत किंवा घोरोपस- र्गाच्या वेळीं है व्रतपूजन करावे. तेव्हां या व्रत आहकांनीं प्रातःकाळीं सुस्खोष्णनलाने अभ्यंगस्नान करून अगावर दृढधौत वस्त्र धारण करावीत. मग सर्व पूजासामग्री आपल्या हाती घेऊन जिनालयास जावे. तेथे गेल्यावर मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईषद्धिपूर्वक श्रीजितेंद्रास भक्तीने साष्टांग प्रणिपात करावा….