(३८) बृहत्श्रुतस्कंधव्रतकथा.
बृहत्श्रुतस्कंधव्रतकथा. व्रतविधि – कार्तिक शु. ४ दिवशीं या व्रतिकांनीं एकभुक्ति करून पंचमीच्या दिवशीं प्रातःकाळी सुखोष्ण जलाने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौतवर्षे धारण करावीत. मग सर्व पूजासाहित्य हातीं घेऊन जिनालयांस जावें. येथे गेल्यावर मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊ ईर्यापधशुद्धि वगैरे क्रिया कराव्यात. श्रीजिनेंद्रास सक्तीनें साष्टांग प्रणि- पात करावा. मंडप श्रृंगारून वरती यंत्रयुक्त चंद्रोपक बांधायें. देवापुढेंच शुद्धभूमीवर पंचवर्णानीं श्रुतस्कंध…