(१००) सीतादेवीव्रतकथा.
सीतादेवीव्रतकथा. व्रतविधि – प्रति नंदीश्वर पर्वांत प्रत्येक मंदर पर्वतावर प्रत्यक्ष आऊन पूजा करता येत नाहीं. याकरितां या व्रतधारकांनी प्रमाती शुचिजलाने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढचौत वस्ने धारण करावींत. सर्व पूजाद्रव्ये हातीं घेऊन मंदिरास जावें. जिनालयास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथशुद्धिपूर्वक वगैरे सर्व क्रिया करून जिनेंद्रास मक्तीने साष्टांग नमस्कार करावा. पीठावर पंचमंदिरस्थित जिनबिंबाची स्थापना करून त्यांचा पंचामृतांनी अभिषेक…