(९३) फलमंगळवारव्रतकथा.
फलमंगळवारव्रतकथा. व्रतविधि – आषाढ, कार्तिक, फाल्गुन या तीन मासांत जे मंगळ- वार येतील त्या दिवशीं प्रभातीं या व्रतिकांनीं शुचिजलाने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौत वस्ने धारण करावींत. सर्व पूजाद्रव्ये हातीं घेऊन जिनालयास जावें. मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून इर्यापथशुद्धि क्रिया- पूर्वक श्रीजिनेंद्रास मक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. जिनेश्वरास पंचा- मृतांनीं अभिषेक करून त्यांची अष्टद्रव्यांनीं अर्चना करावी. श्रुत व…