(४८) [निर्भूत] निर्दोषसप्तमी व्रतकथा.
[निर्भूत] निर्दोषसप्तमी व्रतकथा. व्रतविधि – भाद्रपद शु.७ दिवशीं या व्रतिकांनीं प्रासुक पाण्याने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौत वस्त्र धारण करावीत. मग सर्व पूजा साहित्य बरोबर घेऊन जिनालयास जावें. मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापथ शुद्धिपूर्वक श्रीजिनेंद्रास भक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. मंडप श्रृंगार करून देवापुढें शुद्धभूमीवर – [ स्रग्धरावृत्त ] व्हींकारं चंद्रमध्ये बहिरपि वलयं षोडशं वर्णयुक्तं । बाह्याष्टं…