( १५५) कवलचांद्रायण व्रतकथा.
कवलचांद्रायण व्रतकथा. व्रतविधि – चैत्रादि बारा मासांतून कोणत्याहि मासाच्या अमां-वस्येदिवशीं या व्रतास प्रारंभ करावा. त्या दिवशीं प्रातःकाळीं या व्रति-कांनीं सुखोष्णजलानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौतवले धारण करावींत. मग सर्व पूजासाहित्य हातीं घेऊन जिनालयास जावे. तेथे गेल्यावर मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापथशुद्धि वगैरे क्रियापूर्वक श्रीजिनेंद्रास भक्तोनें साष्टांग नमस्कार करावा. नंदादीप लावावा. नंतर श्रीपाठवर श्रीचंद्रप्रभतीर्थकर प्रतिमा श्याम यक्ष…