( १५३) ज्ञानाचार व्रतकथा.
ज्ञानाचार व्रतकथा. व्रतविधि – आचढ शु. ७ दिवशीं या व्रतिकांनी एकमुक्ति करावी. ८ दिनीं प्रमातीं प्रासुक उदकाने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढ घौतवस्त्र धारण करावी. सर्व पूजाद्रव्ये बरोबर घेऊन जिनालयास जांचे मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापथशुद्धिपूर्वक जिनेंद्रास भक्तीने साष्टांग नमस्कार करावा. नंदादीप लावावा. पोठावर आदिनाथ तीर्थंकर प्रतिभा गोमुखयक्ष चक्रेश्वरी यक्षोसह स्थानून तिला पंचामृतांनीं अभिषेक करावा,…