( १७८)वेदनीयकर्मनिवारण व्रतकथा.
( १७८)वेदनीयकर्मनिवारण व्रतकथा. व्रतविधि-आषाढ शु. १० दिवशीं या व्रतिकांनीं एक-भुक्ति करावी. आणि एकादशी ११ दिनीं प्रातःकाळीं शुचि-जलाने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधीतवर्षे धारण करावींत. सर्व पूजाद्रव्ये हातीं घेऊन मंदिरास जावें. जिनालयास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापथशुद्धिपूर्वक जिनेंद्रास भक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. पीठावर संभवनाथ तोर्थकर प्रतिमा त्रिमुख यक्ष व प्रज्ञप्ति यक्षीसह स्थापून तिला पंचामृतांनीं अभिषेक करावा. अष्टद्रव्यांनी त्यांची…