(३१५) चतुरशीतिगणधर व्रतकथा. व्रतविधि – मार्गशीर्ष कृ. ९ दिवशीं या व्रतिकांनी एकमुक्ति करावी. आणि १० दिवशीं प्रातःकाळीं शुचिजलाने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौतवस्त्रे धारण करावींत. मग सर्व पूजासामग्री आपल्या हातीं घेऊन जिनालयास जावे. तेथे गेल्यावर मंदिराप्त तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापथशुद्धि वैगैरे क्रिया कराव्यात. श्रीजिनेंद्रांस मक्तीनें साष्टांग प्रणिपात करावा. नंदादीप लावावा. श्रीपीठावर चोवीस तीथे-कर प्रतिमा यक्ष यक्षीसहित…