(२४२) निःशंकितांग व्रतकथा-
(२४२) निःशंकितांग व्रतकथा- व्रतविधि-आश्विन कृ. ३० दिवशीं या व्रतिकांनी एकमुक्ति करावी. आणि कार्तिक शु. १ दिवशीं प्रातःकाळी सुखोष्ण जलानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौत वस्ने धारण करावीत. सर्व पूजा द्रव्ये हातीं घेऊन जिनालयास जावें. मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथशुद्धिपूर्वक जिनेंद्रास भक्तीने साष्टांग नमस्कार करावा. नंदादीप लावावा. पोठावर चोवीस तीर्थकर प्रतिमा यक्ष, यक्षीसह स्थापून तिला पंचामृतांनीं अभिषेक…