( ३२६) सगरचक्रवर्ति व्रतकथा.
( ३२६) सगरचक्रवर्ति व्रतकथा. व्रतविधि – मार्गशीर्ष शुक्लाक्षांतील पहिल्या शनिवारी या व्रति-कांनीं एकभुक्ति करात्री. आणि रविवारीं प्रातःकाळीं शुद्धपाण्यानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौतवस्त्रे धारण करावींत. सर्व पूजाद्रव्यें हातीं घेऊन जिनालयास जावे. मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्याप-यशुद्धिपूर्वक जिनेंद्रास भक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. नंदादीप लावावा. पीठावर विमलनाथ तीर्थकर प्रतिमा पाताळयक्ष व वैरोटी यक्षीसह स्थापून तिला पंचामृतांनीं अभिषेक करावा….