(९५) बलगोंवद (बलप्रद) व्रतकथा.
बलगोंवद (बलप्रद) व्रतकथा. व्रतविधि – भाद्रपद शु. १० दिवशीं या व्रतिकांनीं प्रभातीं सुखोष्ण जलानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौतवस्ने धारण करा- वींत. सर्व पूजा द्रव्ये हातीं घेऊन जिनालयास जावे. मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथशुद्धिपूर्वक जिनेंद्रास भक्तीने साष्टांग प्रणिपात करावा. पीठावर २४ चोवीस तीर्थकर प्रतिमा स्थापून तिला पंचामृतांनीं अभिषेक करावा. अष्टद्रव्यांनी त्यांची अर्चना करावी. श्रुत व…