(८४) माघमालाव्रतकथा.
माघमालाव्रतकथा. व्रतविधि – माघ शु. १५ दिवशीं प्रातःकाळीं या व्रतिकांनीं शुद्धोद- कार्ने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधीत वस्ने धारण करावींत. सर्व पूजाद्रव्ये हातीं घेऊन जिनालयास गमन करावें. मंदिरास तीन प्रद- क्षिणा घालून ईर्यापथशुद्धिपूर्वक जिनेंद्रास भक्तीने साष्टांग प्रणाम करावा. नंदादीप लावावा. मंडप श्रृंगार करून नूतन वस्त्राचे चंद्रोपक बांधावे. देवापुढे शुद्धभूमीवर पंचवणानों अष्टदल कमल काढून त्याच्या सभोवतीं…