३ .अक्षयतृतीया व्रतकथा
अथ अक्षयतृतीया व्रतकथा – व्रतविधि – वैशाख शु. ३ पासून प्रपर्यंत पांच दिवस या व्रतधारकांनी स्नानादिकांनी शुचिर्भूत होऊन शुद्ध मनानें श्रीजिनमंदिरांस जावें. तेथे गेल्यावर मंदिरासमेत हो प्रदक्षिणा घादन ईर्यापथशुध्यादि क्रिया कराव्यात. मग यक्षयक्षीसह श्रीवृषभनाथ तीर्थकर प्रतिमा सिंहास- नावर स्थापन करून तिला पंचामृतांनी अभिषेक करावा. नंतर अष्टक, स्तोत्र, जयमाला हीं म्हणत आठ द्रव्यांनी अर्चना करावी. मग…