२६.सुगंधबंधुरव्रतकथा.
सुगंधबंधुरव्रतकथा. व्रतविधी – श्रावण शु० १ पासून कार्तिक शु० १५ पर्यंत जिनमंदिरांत प्रति दिवशीं जाऊन पार्श्वनाथ तीर्थकरास घरणेंद्र यक्ष व पद्मावती यक्षीसह पंचामृताभिषेकपूजा करावी, अष्टद्रव्यांनी त्यांची अर्चना करावी. पुढील मंत्राने १०८ पुप्पें घालावींत व्रतकथा वाचावी. पायम व तूप यांचे चरू अर्पण करावेत. या अवधींत येणाऱ्या अष्टमी आणि चतुर्दशींच्या दिवशीं पूर्ववत्च अभिषेक पूजा करून पांच घृतयुक्त…