( ४० ) पार्श्वतृतीया [तदगी] व्रतकथा
पार्श्वतृतीया [तदगी] व्रतकथा व्रतविधि-श्रावण शु. ३ दिवशीं या व्रतिकांनीं शुचिजलाने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौतवस्त्र धारण करावीत. सर्व पूजा साहित्य हातीं घेऊन जिनालयास जावें. मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथंशुद्धिपूर्वक श्रीजिनेंद्रांस मक्तीनें साष्टांग प्रणिपात करावा. श्रीपीठावर पार्श्वनाथ तीर्थंकर प्रतिमा घरणेंद्र यक्ष व पद्मावर्ती यक्षीसह स्थापून तिचा पंचामृतांनीं अभिषेक करावा. अष्टद्रव्यांनी त्यांची अर्चना करून घृतशर्करायुक्त पायसांचे चरु त्यांना…