( ११७) रत्नभूषणव्रत कथा.
रत्नभूषणव्रत कथा. व्रतविधि – आषाढ शु. १ दिवशीं एकमुक्ति करावी. आणि ३ दिवशीं प्रभातीं या व्रतिकांनीं पासुक उदकाने अभ्यंगस्नान करून अंगा- बर दृढौत वर्षे धारण करावीत. सर्व पूजाद्रव्ये हातीं घेऊन जिनाल- यास जावें. मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन इंर्यापथशुद्धिपूर्वक जिनेंद्रास मक्तोनें साष्टांग नमस्कार करावा. पीठावर रत्नत्रय-अरमल्लि मुनिसुव्रत प्रतिमा स्थापून त्यांचा पंचामृतांनीं अभिषेक कराश. अष्टद्रव्यांनी त्यांचो अर्चना…