(९७) सप्तयक्षीव्रत अथवा देवकीव्रतकथा
सप्तयक्षीव्रत अथवा देवकीव्रतकथा व्रतविधि – श्रावण शु. ६ दिवशीं या व्रतिकांनी एकमुक्ति करात्री. ७ दिवशीं प्रभातीं शुचिजलाने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधीत वस्ने धारण करावीत. सर्व पूजासाहित्य हातीं घेऊन जिना- लयास जायें. मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथशुद्धिपूर्वक श्रीजिनेंद्रास मक्तीने साष्टांग नमन करावे. पीठावर सुपार्श्वनाथ तीर्थकर प्रतिमा नंदिविजय यक्ष कालीयक्षीसह स्थापून तिला पंचा- मृतांनीं अभिषेक करावा. वृषभादि…