( ११६ ) पुण्यसागर व्रतकथा.
पुण्यसागर व्रतकथा. व्रतविधि-आषाढ, कार्तिक, फाल्गुन, या मासांतील कोणत्या- हि नंदीश्वर पर्वांत शु. ७ दिवशीं प्रातःकाळीं शुचिजलानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौत वने धारण करावीत. मग सर्व पूजा साहित्य बरोबर घेऊन जिनालयास जात्रे, मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापणशुद्धिपूर्वक जिनेंद्रास भक्तीने साष्टांग नमस्कार करावा, पीठावर पंचपरमेष्ठी व नवदेवता प्रतिभा स्थापून त्यांना पंचामृतांनी अभिषेक करावा, नष्टद्रव्यांनी त्यांची अर्चना करावी….