२९. पंचालंकार व्रतकथा.
पंचालंकार व्रतकथा. व्रतविधि – आषाढ शु. ५ दिनीं या व्रतिकांनीं शुचि जलानें अभ्यंगस्नान करून आंगावर दृढधीत वर्षे धारण करावींत. सर्व पूजा साहित्य बरोबर घेऊन जिनालयास जावें. मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापथशुद्धि वगैरे क्रिया करून जिनेंद्रास भक्तीनें नमस्कार करावा. श्रीपीठावर पंचपरमेष्ठी मूर्ति स्थापून तिचा पंचामृतांनी अभिषेक कराया. अष्टद्रव्यांनी त्यांची अर्चना करावी. श्रुत व गुरु यांची पूजा…