४१. नित्यानंदव्रतकथा.
नित्यानंदव्रतकथा. व्रतविधि-आषाढ, कार्तिक, फाल्गुन या मासांतील कोणत्याहि एका नंदीश्वर पत्रीत अष्टमी दिवशीं या व्रतधारकांनी प्रातःकाळीं प्रासुक जलानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौत वखें धारण करा- बींत. सर्व पूजासाहित्य बरोबर घेऊन जिनालयास जावें. मंदिरास तीन प्रदक्षिणा करून ईर्यापथशुद्धि वगैरे क्रियांपूर्वक श्रीजिनेंद्रास भक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. श्रीपीठावर चतुर्विंशति तीर्थकर प्रतिमा यक्ष, यक्षीसह स्थापून तिचा पंचामृतांनीं अभिषेक करावा. अष्टद्रव्यांनीं…