( १४३) दशपर्व व्रतकथा.
दशपर्व व्रतकथा. व्रतविधि– आषाढ मासांतील अष्टान्हिकांत या व्रतधारकांनीं शुचिजलानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौत वस्त्रे धारण करावीत. सर्व पूजाद्रव्ये बरोबर घेऊन जिनालयास जावे. मंदिरास तीन प्रद- क्षिणा देऊन ईर्यापथशुद्धिपूर्वक जिनेंद्रास भक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. पीठावर चोत्रीस तीर्थकर प्रतिमा यक्षयक्षीसह स्थापून तिला पंचामृतांनीं अभिषेक करावी. अष्टद्रव्यांनीं त्यांची अर्चना करावी. श्रुत व गणधर यांची पूजा करून यक्ष,…