१.श्रीपंचमीव्रतकथा
अथ श्रीपंचमीव्रतकथा सुरोरगनराशि – । लालितांत्रिसरोरुहं ॥ नत्त्वा नेमिजिनार्धाशं । वक्ष्ये श्रीपंचमीकर्या ।। व्रत विधि- ( सूचना प्रत्येक व्रताराचनादिवसाच्या आधल्या दिवशी पूजार्च- नादि करून व्रताचा नियम करावा घरी जाऊन एकमुक्ति करावी. आणि आपण घेतलेल्या व्रताचे उद्यापन न केल्यास व्रत दुप्पट दिवस करावें.) आषाढ शु. ५ दिवशी या अतिकांनी प्रातःकाळीं सुखोष्ण जलानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौतं…