( ८९)रत्नत्रयव्रतकथा.
रत्नत्रयव्रतकथा. व्रतविधिः- भाद्रपद शु. १२ दिवशीं या व्रतधारकांनीं एक- भुक्ति करात्री, आणि १३-१४-१५ या तीन दिवशीं प्रातःकाळीं सुखोष्ण जलाने अभ्यंगस्नान करून आपल्या अंगावर दृढधौत वले धारण करावीत. सर्व पूजा सामग्री हातीं घेऊन जिनालयास जावे. मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथशुद्धि वगैरे क्रियापूर्वक जिनेंद्रास भक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. मंडपश्रृंगार करून वर चंद्रोपक बांधावें, देवापुढे शुद्धभूमीवर पंचवर्षांनीं रत्नत्रययंत्रदल…