३६) अथ केवलबोधव्रतकथा.
केवलबोधव्रतकथा. व्रतविधि – भाद्रपद शु. ११ दिवशीं प्रातःकाळीं या व्रत धार- कांनीं शुचि जलानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौत वर्षे धारण करावीत. मग सर्व पूजासाहित्य बरोबर घेऊन जिनालयास जावें. मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापथशुद्धि वगैरे क्रियांपूर्वक श्रीजिनें- द्रास भक्तीनें साष्टांग प्रणिपात करावा. श्रीपीठावर पंचपरमेष्ठी मूर्ती यक्ष, यक्षीसह स्थापून तिचा पंचामृतांनीं अभिषेक करावा. अष्टद्रव्यांनी त्यांची अर्चना करावी….