(६०) (कल्पांवर ) कल्पामर व्रतकथा.
कल्पामर व्रतकथा. व्रतविधि – श्रावण शु. १४ दिनीं प्रातःकाळी या व्रतिकांनीं प्रासुक पाण्यांनी अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौत बखें घ्यावीत. सर्व पूजासामग्री बरोबर घेऊन जिनालयीं जावें. मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापथशुद्धिपूर्वक श्रीजिनेंद्रास भक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. पीठांत श्रीजिनप्रतिमा यक्ष, यक्षीसह स्थापून तिला पंचामृतांनीं अभि- बेक करावा. अष्टद्रव्यांनी अर्चना करावी. श्रुत व गुरु यांची पूजा करून यक्ष,…