३७.पुष्पांजलि व्रतकथा,
पुष्पांजलिव्रतकथा व्रतविधि – भाद्रपदादि चैत्रमासांत या आठ महिन्यांतील कोण- त्याहि महिन्यांत शु. ५ ते ९ पर्यंत पांच दिवस हैं व्रत पाळावे. कोण- त्याहि मासांतील शु. ४ च्या दिवशीं या व्रतधारकांनी एकमुक्ति करावी आणि ५ दिवशी प्रातःकाळीं शुद्ध जलानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौत वर्षे धारण करावींत. मग सर्व पूजासाहित्य हातीं घेऊन जिनालयास जावें. तेथे मंदिरास तीन…