(१२) अथ अणति (पौर्णिमा) व्रतकथा.
(१२) अथ अणति (पौर्णिमा) व्रतकथा. व्रतविधि-आषाढ, कार्तिक, फाल्गुन या मासांत येणाऱ्या कोणत्याहि नंदीश्वरपर्वात पूर्णिमेदिवशीं या व्रतिकांनीं प्रभातीं शुद्धोदकानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौत वर्षे धारण करावींत. सर्व पूजा- साहित्य करीं घेऊन जिनालयीं जावें. तेथे गेल्यावर मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथशुद्धि वगैरे क्रिया करून जिनेंद्रास भक्तीनें वंदना करावी. श्रीपीठावर चोवीस तीर्थकरांची प्रतिमा यक्ष यक्षीसहित स्थापून पंचामृतांनीं तिला…