( १४६) वचनगुप्ति व्रतकथा.
वचनगुप्ति व्रतकथा. व्रतविधि-कायगुप्ति व्रतविधिप्रमाणेच करावें फक्त आदिनाथ तीर्थंकरांच्या ऐवजी अजितनाथ तीर्थकरांची आराधना करावयाची आहे. मंत्र जाप्य – ॐ ह्रीं श्रीं क्लीं ऐं अर्हं अजितनाथतीर्थंकराय महायक्ष-रोहिणीयक्षीसहिताय नमः स्वाहा ॥ महार्थ्याला दोन पाने लावणे. – कथा – पूर्वी भूतिलक नांवाच्या नगरांत प्रजापाल नांवाचा धर्मनिष्ठ राजा नीताने सपरिवार राज्य करीत होता. त्याने हे व्रत गुरुजवळ घेऊन यथाविधि पाळिले…