(८८) नागपंचमी आणि श्रियाळषष्ठी व्रतकथा.
नागपंचमी आणि श्रियाळषष्ठी व्रतकथा. व्रतविधि – श्रावण शु. ५ दिवशीं या व्रतिकांनीं प्रातःकाळीं शुचिजलाने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौत वस्त्र ध्यावींत. पूजा- सामग्री हातीं घेऊन जिनालयास जावें. मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापथशुद्धि वगैरे क्रियापूर्वक जिनेंद्रास भक्तोनें साष्टांग नम- स्कार करावा. पीठावर पार्श्वनाथ तीर्थकर प्रतिमा धरणेद्रयक्ष व पद्मावती यक्षीसह स्थापून तिला पंचामृतांनी अभिषेक करावा. अष्ठ द्रव्यांनी त्यांचीं…