( १२२) लक्ष्मीमंगल व्रतकथा.
लक्ष्मीमंगल व्रतकथा. व्रतविधि – आश्विन कृ. १२ दिवशीं या व्रतिकांनीं एकमुक्ति करावी. आणि १३ दिवशीं प्रातःकाळीं सुखोष्णजलाने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौत वस्ने धारण करावीत. सर्व पूजा द्रव्ये बरोबर घेऊन जिनालयास जावे. मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापथशुद्धि- पूर्वक जिनेंद्रास मक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. पीठावर सुतिनाथ तीर्थकर प्रतिमा तुंचरु यक्ष व पुरुपदत्ता यक्षीसह स्थापून तिला पंचा- मृतांनीं…