( ६६ ) भव्यानंदव्रतकथा.
भव्यानंदव्रतकथा. व्रतविधि – आषाढ, कार्तिक, फाल्गुन या मासांतील कोणत्याहि एका नंदीश्वर पर्वाव शु. ८ दिवशीं या व्रतिकांनीं प्रभातर्ती शुद्धजलांनीं स्नान करून अंगावर धौतवस्ने धारण करावींत. सर्व पूजासामग्री हातीं घेऊन जिनालयीं जावें. मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून ईयर्यापथशुद्धि- पूर्वक जिनेश्वरांस मक्तीने नमस्कार करावा. पीठावर पंचपरमेष्ठींची प्रतिमा स्थापून तिला पंचामृतांनी अभिषेक करावा. पंचभक्ष्यांचे व पायसांचे चरु अर्पावेत, अष्टद्रव्यांनीं…