(५६) कल्पकुजव्रतकथा
कल्पकुजव्रतकथा व्रतविधि – आषाढ, कार्तिक, फाल्गुन या मासांतील कोणत्याहि नंदीश्वर पति शु० ८ दिवशीं प्रभाती शुचिजलानी या व्रतिकांनीं अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौत वखें घ्यावीत. सर्व पूजासामग्री बरोबर घेऊन मंदिरास जावें. जिनालयास तीन प्रदक्षिणा करून ईर्या- पथशुद्धिपूर्वक जिनेश्वरांस भक्तीनें साष्टांग प्रणिपात करावा, पीठावर जिनेंद्र प्रतिमा यक्षयक्षीसह स्थापून तिचा पंचामृतांनी अभिषेक करावा. अष्टद्रव्यांनी त्यांची अर्चना करात्री. श्रुत…