(८०) अक्षयसुखसंपत्तिव्रतकथा.
अक्षयसुखसंपत्तिव्रतकथा. व्रतविधि – फाल्गुन शु. १ दिवशीं प्रातःकाळीं या नतिकांनी शुचिजलाने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौत वस्ने धारण करावीत. नंतर सर्व पूजासामग्रओ आपल्या हातीं घेऊन जिनालयास जावें. तेथे गेल्यावर मंदिरास तीन प्रदक्षिणा घेऊन ईर्यापथशुद्धि वगैरे क्रियांपूर्वक श्रीजिनेंद्रास भक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. नंदादीप लावावा. मग श्रीपीठावर श्रीपंचपरमेष्ठी प्रतिमा स्थापून त्यांचा पंचामृतांनी अभिषेक करावा. देवापुढे एका पाटावर पांच…