(२५०) क्षायिकसम्यक्त्वव्रतकथा.
(२५०) क्षायिकसम्यक्त्वव्रतकथा. व्रतविधि – ज्येष्ठ शु. २ दिवशीं या व्रतधारकांनीं एकभुक्ति करावी, आणि ३ दिनीं प्रभातीं शुद्धोदकानें अभ्यंगस्नान करून अंगा-वर दृढधौत वस्ने धारण करावींत. सर्वपूजा साहित्य आपल्या हातीं घेऊन जिनालयास जावें. मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापथशु-द्धिपूर्वक जिनेंद्रास भक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. नंदादीप लावावा. पीठावर रत्नत्रयप्रतिमा (अर, मल्लि, मुनिसुव्रत तीर्थंकर जिनप्रतिमा )यज्ञ, यक्षीसह स्वापून त्यांचा पंचामृतांनी…