(५) निरतिशय व्रतकथा
निरतिशय व्रतकथा व्रतविधि-आपाढ, कार्तिक व फाल्गुन या तीन मासांत येणाऱ्या कोणत्याहि नंदीश्वर पर्वातील अष्टमी दिवशी या व्रतधारकांनी प्रभाती शुचि जलानें अभ्यंगस्नान करून दृढधौत बखें धारण करावींत. सर्व पूजा साहित्य आपल्या हातीं घेऊन जिनालयीं जावें. तेथे गेल्यावर ईर्थापथ शुध्यादि क्रिया करून जिनेंद्रास भक्तीनें नमस्कार करावा. श्रीपीठावर चोवीस तीर्थकरप्रतिमा स्थापन करून पंचामृताचा अभिषेक करावा. चोवीस तीर्थकरांची अष्टके,…