(९९) रामनवमी व्रत.
रामनवमी व्रतकथा. व्रतविधि – चैत्र शु. ५ ते ९ पर्यंत पांच दिवस धर्मध्यानांत काल घालवावा. प्रतिदिवशीं जिनेंद्रास पंचामृतांनीं अभिषेक करून अष्टद्रव्यांनीं त्यांची अर्चना करावी. श्रुत व गणधर पूजा करून यक्ष, यक्षो, ब्रह्मदेव यांचे अर्चन करावें, ॐ ह्रीं श्रीं क्लीं ऐं अर्हं परम- ब्रह्मणे अनंतानंतज्ञानशक्तये अर्हत्परमेष्ठिने नमः स्वाहा ॥ या मंत्राने १०८ पुष्र्षे घालावींत. श्रोजिनसहस्रनामस्तोत्र म्हणून…