(५५) बुधाष्टमीव्रतकथा.
बुधाष्टमीव्रतकथा. व्रतविधि – चैत्रादि बारामासांतून कोणत्याहि मासांत ज्या दिवशी बुधवारी अष्टमी तिथी असेल त्या दिवशीं प्रातःकाळीं या व्रतधारकांनीं सुखोष्ण जलानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौतवस्त्रे धारण करावीत. मग सर्व पूजासाहित्य आपल्या हातीं घेऊन जिनालयास जावें. तेथे गेल्यावर मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथ शुद्धयादि क्रियांपूर्वक श्रीजिनेंद्रास भक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. नंदादीप लावावा. श्रीपीठावर श्रीपंचपरमेष्ठी वर्धमान तीर्थकर प्रतिमा…