३१. ईरैदुगोळन व्रतकथा. [ द्विपंचव्रत ]
ईरैदुगोळन व्रतकथा. [ द्विपंचव्रत ] व्रतविधिः – श्रावणमासीं ज्या दिवशी उत्तरा नक्षत्र येईल त्या दिवशीं या व्रतिकांनी प्रभाती सुखोष्ण उदकाने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौत वस्खें धारण करावीत. सर्व पूजासामग्री हातीं घेऊन चैत्यालयास जावें. मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथ शुद्धिपूर्वक जिनेंद्रास भक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. श्रीपीठावर शीतलनाथ तीर्थकर प्रतिमा ईश्वर यक्ष मानवी यक्षीसहित स्थापून तिला पंचा-…