(१७६) ज्ञानावरणीयकर्मनिवारण व्रतकथा.
(१७६) ज्ञानावरणीयकर्मनिवारण व्रतकथा. व्रतविधि – आषाढ, कार्तिक, फाल्गुन या माचीं येणाच्या कोण-त्याहि एका नंदीश्वर पर्वांत सप्तमो दिवशो एकभुक्ति करावी. आणि अष्टमी दिवशीं या व्रतिकांनीं प्रभातीं शुचिजलाने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौतवर्षे धारण करावीत. सर्व पूजाद्रव्ये आपल्या हातीं घेऊन जिनालयास जावे. मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथ-शुद्धिपूर्वक जिनेंद्रास भक्तोनें साष्टांग नमस्कार करावा. पीठावर आदिनाथ तीर्थ कर प्रतिमा गोलुखयक्ष…